जळगाव (प्रतिनिधी) – लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन व लोक संघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरसाठी सर्व स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
कोविड केअर सेंटरमध्ये दाखल कोरोना रुग्णांसाठी हितेश जगताप, विरेंद्र राजपूत, पंकज शर्मा, क्षितिज भालेराव, प्रफुल्ल पाटील यांनी किराणा उपलब्ध करून दिला.
जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, माजी महापौर ललित कोल्हे, बहिणाबाई कोविड केअर सेंटरचे प्रतिभा शिंदे, चंदन कोल्हे, सचिन धांडे, महेश चौधरी, पराग महाजन, प्रमोद पाटील यांनी या किराणा सामानाचा स्वीकार केला.
सर्वोत्कृष्ट सेवा पुरवीत असलेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरसाठी सर्व स्वयंसेवक दिवसरात्र परिश्रम घेत असून अधिकाअधिक रुग्णांना सेवा पुरविण्याचा पदाधिकाऱ्यांचा मानस आहे.