नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक करणाऱ्यांना ‘मानवतेचे शत्रू’ संबोधत त्यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. रासुका लावण्यात आलेले हे सहा जण तबलीकी जमातशी संबंधित असून त्यांना कोरोना संशयितम्हणून एमजीएम जिल्हा रुग्णालयातील विलगता कक्षामध्ये ठेवण्यात आलं होतं. या ठिकाणी सदर इसमांनी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप आहे.’ते मानवतेचे शत्रू असल्याने कायदा आणि व्यवस्थेचे पालन करणार नाहीत. त्यांनी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत केलेली गैरवर्तणूक एक गंभीर गुन्हा असून आम्ही त्यांना सोडणार नाही.’ अशा कठोर शब्दांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी घडलेल्या प्रकरणाची निंदा केली.तत्पूर्वी, तबलीकी जमातीमध्ये सहभागी झालेल्या काही व्यक्तींना कोरोना आजाराचा धोका लक्षात घेता उत्तर प्रदेशातील एमजीएम रुग्णालयातील विलगता गृहामध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी दाखल करण्यात आलेल्या सहा जणांनी काल रुग्णालयामध्ये नग्न अवस्थेत वावर करत महिला कर्मचाऱ्यांना उद्देशून अश्लील हालचाली केल्याचा आरोप आहे.