मुंबई : ‘करोना’ व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी उपाययोजना आखले जात आहेत. राज्यभरातील थिएटर आणि नाट्यगृह मार्चअखेरपर्यंत बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता टीव्ही मालिका-चित्रपटांचे शूटिंगही बंद करण्यात येणार आहे. यातच मनोरंजन क्षेत्रातील जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी ट्विट केले आहे.
दरम्यान, दिलीप कुमार यांनी ट्विट केले आहे की,’मला करोना वायरसमुळे वेगळे ठेवण्यात आले आहे. म्हणजेच आइसोलेशन विभागात हलविण्यात आले आहे. सायरा या माझी काळजी घेत असून मला कुठेलेही इंफेक्शन होणार नाही याची खबरदारी ती घेत आहे. अशा प्रकारे ती माझ्या प्रकृतीची काळजी घेत आहे.’ असं त्यांनी ट्विट करत आपल्या फॅन्सना माहिती दिली आहे.
दाग, शक्ति, राम और श्याम, लीडर नया दौर, देवदास आज़ाद, यांनसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या दमदार भूमिकेसाठी त्यांना फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार तब्बल आठ वेळा मिळाला आहे.