Notice: Undefined index: weather_location in /home/kesariraj/public_html/wp-content/plugins/jnews-weather/class.jnews-weather.php on line 64
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन - Kesariraj
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • सिनेमा
  • विश्व
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • सिनेमा
  • विश्व
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2020
in महाराष्ट्र
0
बातमी शेअर करा

पुणे – मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी आज पहाटे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. दुपारी बारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जयराम कुलकर्णी यांच्या मागे पत्नी डॉ. हेमा कुलकर्णी, मुलगा रुचिर हा पेशाने वकील आहे. अभिनेत्री मृणाल देव- कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून आहेत. सध्या छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस कुलकर्णी हा त्यांचा नातू आहे.

जयराम कुलकर्णी यांचा अल्प परिचय

जन्म. १७ ऑक्टोबर १९३२

जयराम कुलकर्णी यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे गाव. जयराम कुलकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका त्यांना साकारायला मिळाली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच. जयराम कुलकर्णी असा शिक्का त्यांच्यावर बसला. कॉलेज शिक्षणा नंतर १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी लागली. नाटकात कामे करण्याची हौस असल्याने १९७० साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. शूटिंग मुंबई आणि कोल्हापूरला असल्याने नोकरीत अडचण येऊ लागली. त्यामुळे आकाशवाणीच्या नोकरीला रामराम ठोकावा लागला.

आकाशवाणीत नोकरी करत असताना व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या बरोबरच ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते द. मा. मिरासदार, आनंद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांशी आकाशवाणीच्या नोकरीमध्ये संबंध आला व अनेक कलाकारांसोबत त्यांची ओळख झाली. याचाच फायदा चित्रपटात काम करताना उपयोगी पडला. चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम कुलकर्णी या समीकरणानेच प्रत्येक जण माझ्याकडे पाहू लागला. सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका त्यांनी चित्रपटांतून केल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या. पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकाही त्यांच्या गाजल्या. महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांत पोलिसांची भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या.

बातमी शेअर करा
Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

  • Trending
  • Comments
  • Latest

ब्रेकिंग न्यूज : धक्कादायक : जळगाव जिल्ह्यात आणखी ४५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले

May 31, 2020

जळगावातील माजी महापौरांच्या मुलाची निर्घृण हत्या ; दोन जण ताब्यात

November 5, 2020

माजी महापौरांच्या मुलाचा खून ; शिवाजीनगरातील खळबळजनक घटना

November 4, 2020

जळगावात पुन्हा तरुणाचा खून

November 9, 2020

जळगाव-पाळधी दरम्यान ट्रॅक्टर चालक अपघातात ठार

0

कार प्रेमींकरिता खूशखबर…फोर्डच्या नवीन बी.एस.6 गाड्यांचा भव्य लॉन्चिंग सोहळा 1 मार्चला…

0

दिल्ली दंगलीतील गुप्तचरांच्या अपयशाची चौकशी करा – खा. सुप्रिया सुळे

0

गो. से. हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

0
महात्मा गांधी हेच आजचे ‘युथ आयकॉन’- एम. राजकुमार

महात्मा गांधी हेच आजचे ‘युथ आयकॉन’- एम. राजकुमार

January 30, 2023
जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये महात्मा गांधी स्मृतिदिनी श्रद्धांजली

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये महात्मा गांधी स्मृतिदिनी श्रद्धांजली

January 30, 2023
जळगावातील विवाहितेची नाशिकला सासरी आत्महत्या, पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील विवाहितेची नाशिकला सासरी आत्महत्या, पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

January 30, 2023
वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

तरूणाला तिघांकडून मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

January 30, 2023

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Uncategorized
  • अपघात
  • आरोग्य
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • जळगाव
  • नवी दिल्ली
  • भारत
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महात्मा गांधी हेच आजचे ‘युथ आयकॉन’- एम. राजकुमार

महात्मा गांधी हेच आजचे ‘युथ आयकॉन’- एम. राजकुमार

January 30, 2023
जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये महात्मा गांधी स्मृतिदिनी श्रद्धांजली

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये महात्मा गांधी स्मृतिदिनी श्रद्धांजली

January 30, 2023
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • सिनेमा
  • विश्व

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • सिनेमा
  • विश्व

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon