पारोळा (प्रतिनिधी)-

पारोळा शहरात वाढत्या कोरोना विषाणू चा होणारा प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून शहरात ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” अभियानाची सुरुवात लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार (पाटील) तहसिलदार अनिल गवांदे व मुख्य अधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली असून यासाठी आज तहसीलदार अनिल गवांदे, आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान, नगरसेवक पी जी पाटील ,नोडल अधिकारी संदीप साळुंखे यांनी जुने पोस्ट गल्ली येथे नागरिकांच्या शरीराचे तापमान ऑक्सीजन लेवल इत्यादी शारीरिक तपासणी करून मोहिमेला सुरुवात केली तसेच प्रत्येक वार्डात सर्व नगरसेवकांनी देखील पालिकेच्या पथकाला सोबत मोहिमेला सुरुवात केलेली आहे.
मोहिमेत पथक दररोज प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन तापमान spo2 तपासणी, ताप खोकला, दम लागणे,spo2 कमी अशी सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना covid-19 चाचणीस पाठवणे इत्यादी कामे करणार असून नगराध्यक्ष करण पवार (पाटील) यांनी पथकाच्या कामांची पाहणी करून त्यांच्या कामाचा आढावा घेऊन पथकांना सूचना दिल्या.







