पुणे (वृत्तसंस्था) – कोरोनच्या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यातील 32 जणांचे स्वब नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते .त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे उमरगा तालुक्यासाठी ही माहिती समाधानाची व दिलासा देणारी आहे. 20 मार्च ते 26 मार्च या कालावधीत उमरगा उपजिल्हा रुग्णालयातून 29 तसेच मुरूम येथील शासकीय रुग्णालयातून 3 असे 32 जणांचे स्वब पुणेतील आय सी एम आर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आले आहे .दरम्यान 26 मार्च नंतर विलगिकरण कक्षात एकही रुग्ण दाखल नाही.परंतु पुणे मुंबई अशा इतर जिल्ह्यातून उमरगा तालुक्यात आलेल्या आणि येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर येऊ नये घरी बसून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन रुग्णालयाकडून करण्यात येत आहे.