भुसावळ (प्रतिनिधी) – अारपीडीतील टेरिटाेरीयल अार्मीच्या ११८ नंबरच्या बटालियनमधील ३२ वर्षीय जवानाने, इन्सास रायफल हनुवटीला लावून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ११.० वाजता ही घटना घडली. मंगेश भगत (वय ३२, रा. चिखली पाे.साेनाटी, जि. मुर्तीजापूर) असे मृत जवानाचे नाव आहे. अारपीडी डेपाेतील जवान मंगेश भगत हे बुधवारी कर्तव्यावर होते. सकाळी त्यांनी अात्महत्या केल्याने अारपीडी डेपाेत खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृत भगत हे एकटेच राहत हाेते. बटालियन १८८ ही नागपूर येथून नाेव्हेंबरमध्ये दाखल झाली हाेती. भगत यांनी अात्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली हाेती, ती चिठ्ठी पाेलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र जवान भगत यांनी त्या चिठ्ठीत काय लिहून ठेवले अाहे, हे सांगण्यास पाेलिस सूत्रांनी नकार दिला. भगत यांच्या अात्महत्येचे कारण चिठ्ठीतून स्पष्ट झाले अाहे, असे डीवायएसपी राठाेड यांनी सांगितले.