• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवकॉलनीतील पाणी प्रश्‍न सौ. भारतीताई सोनवणे यांच्या पुढाकाराने मार्गी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिवकॉलनी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा पाणी प्रश्‍न अखेर महापौर सौ. भारतीताई सोनवणे यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे.

याबाबत वृत्त असे की, शिवकॉलनी परिसरात गेल्या २२ वर्षापासून कमी दाबाने आणि अवेळी पाणी पुरवठा होत होता. अनेक वेळा तक्रारी करून देखील नागरिकांची समस्या दूर होत नव्हती. जून महिन्याच्या सुरुवातीला नागरिकांची तक्रार स्थानिक नगरसेवक सचिन पाटील, माजी नगरसेवक मनोज काळे, बंटी नेरपगारे यांनी महापौरांना कळवली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी तात्काळ दखल घेत अमृत योजनेच्या मक्तेदाराला सांगून मुख्य जलवाहिनीला पाणी पुरवठा जोडण्याच्या सूचना केल्या. अवघ्या महिनाभरात वारंवार पाठपुरावा करून महापौरांनी सर्व जोडण्या करून घेतल्या. रविवारी शिवकॉलनी वासियांना सुरळीत आणि योग्य वेळी पाणी पुरवठा झाला. अनेक वर्षानंतर नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झाल्याने ठिकठिकाणी फटाके फोडून आणि औक्षण करून महापौरांचे स्वागत करण्यात आले.

शिवकॉलनी परिसरातील गट क्रमांक ६० मधील नागरिकांना गेल्या २० वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी रात्रीचे जागरण करावे लागत होते. या परिसरात मध्यरात्री १२ वाजेनंतर पिण्याचे पाणी सोडण्यात येत होते त्यातच पाण्याचा दाब कमी असल्याने १२ तास पाणी सोडूनही नागरिकांना मुबलक पाणी मिळत नव्हते. अनेकांना तर पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. स्थानिक नगरसेवक सचिन पाटील, दिपमाला काळे, माजी नगरसेवक मनोज काळे, प्रभाग समिती सदस्य बंटी नेरपगारे, मनोज भांडारकर यांनी याबाबत महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे तक्रार केली असता महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा अधिकारी, अमृतचे ठेकेदार, स्थानिक नगरसेवक यांना सोबत घेत थेट शिवकॉलनी परिसर गाठून योग्य त्या सूचना केल्या होत्या.

दरम्यान, अवघ्या १५ दिवसात वारंवार पाठपुरावा करून महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण करून घेतले. काम पूर्ण झाल्यानंतर महापौर यांनी स्थानिक नगरसेवक सचिन पाटील, दिपमाला काळे, मनोज काळे, बंटी नेरपगारे, मनोज भांडारकर यांच्यासह जाऊन पाहणी करून आल्या. पाणीपुरवठा सुरळीत होतो की नाही हे पाहण्यासाठी दोन वेळा चाचणी घेण्यात आली. एकदा पाईपलाईन निसटली असता ती तात्काळ जोडण्यात आली.


 

 

Previous Post

मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्ती देवून नवीन कर्ज देण्याची भादलीकरांची मागणी

Next Post

भुसावळात बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक; एलसीबीची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भुसावळात बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक; एलसीबीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon