मुंबई (वृत्तसंस्था) – संचारबंदी व लॉकडाऊनमुळे सर्व पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.या आदेशाचे आज नगररोडवरील एका पेट्रोलपंपावर तंतोतत पालन करत पोलिसांनी चक्क एका नगरसेवकाला पेट्रोल देण्यास नकार दिला.संबंधित नगरसेवकाने पोलिसांच्या या कर्तव्यांचे कौतूक करत त्यांचा सत्कार केला व सोशल मीडियावर ही त्यांच्या या कार्याचे कौतुक केले. नगर रस्त्यावरील प्रभाग क्रमांक चार चे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव डी-मेलो पेट्रोल पंपावर आज सकाळी आपल्या दुचाकी वाहनामध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले त्यावेळी चंदननगर पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी त्यांना अडविले व आपले वाहन हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत नसल्याने आपल्याला पेट्रोल मिळू शकत नाही.असे सांगितले. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिले आहेत त्यांची प्रत सुद्धा नगरसेवकांना दाखविण्यात आली.ही प्रत पाहिल्यावर भैय्यासाहेब जाधव यांनी पोलिसांच्या या कामाचे कौतुक केले. आपण ज्याप्रमाणे कर्तव्य बजावित आहेत ते पाहता आपणच या काळातील खरे हिरो आहात.त्यांनी तातडीने पोलिसांची विनंती मान्य केली व पेट्रोल भरण्याचे टाळले.त्यानंतर मात्र जाधव यांनी पोलिसांचे कौतुक करत त्यांच्या या कार्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले. करोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पद्धतीने शासन काम करताना दिसत आहेत. गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.गर्दी टाळण्यासाठी पोलीस अहोरात्र बंदोबस्त करत आहेत. काही ठिकाणी कारवाई करून तर काही ठिकाणी गांधीगिरी पद्धतीने पोलिस नागरिकांना समजावून सांगत आहेत. त्यांच्या या कामाचे आता सर्वच थरातून स्वागत होत आहे.पोलिसांच्या या कामाचे कौतूक करून त्यांच्याशी कोणीही हुज्जत घालू नये, असे आवाहन नगरसेवक जाधव यांनी केले आहे.