नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशासमोर उभ्या असलेल्या कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. अशातचबॉलीवूड अभिनेता आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल यांनीसुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
सनी देओलने ट्विट केले आहे की,कोरोना विषाणूचा सामना करताना माझ्या लोकसभा मतदार संघातील गुरुदासपूर आरोग्य विभागाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी मी ५० लाखांची मदत करत आहे. त्याचसोबत सनी देओल यांनी गुरुदासपूर मतदारसंघातील सर्व नागरिकांना सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा, गरज नसताना घराबाहेर पडू नका. जेणेकरुन आपण आणि समाज सुदृढ राहू शकेल, असे सांगितले.