मुंबई (वृत्तसंस्था) – देशासमोर उभ्या असलेल्या कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक पुढे सरसावले आहेत, तर याचबरोबरीने मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडुलकर’ने सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे.सचिनने कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकराला प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने असे वृत्त प्रसिद्ध केले आहे. तसेच, तेंडुलकरला याबाबतची कोठेही चर्चा करायची नसल्याचा दावाही या वृत्तपत्रानं केला आहे.दरम्यान, तेंडुलकरने केलेल्या 50 लाखांपैकी 25 लाख हे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री मदत निधीत, तर 25 लाख हे पंतप्रधान मदत निधीत दिले जाणार आहेत. तेंडुलकरच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं की,’ ही मदत केल्याचं सचिनला कोणालाही सांगायचं नव्हतं. असं ते म्हणाले.