जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही 7796 इतकी झाली

जळगाव – आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात 304 कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यात जळगाव शहरासह रावेर आणि पाचोरा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. तर आजच 174 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये 304 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक 107 रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या सोबत रावेर- 29 पाचोरा-21, जळगाव ग्रामीण 15, भुसावळ – 19, अमळनेर – 10, चोपडा-16, भडगाव-05 धरणगाव-18, यावल-6, एरंडोल-4, जामनेर-21, पारोळा-05, चाळीसगाव-15, मुक्ताईनगर -9, बोदवड 4 असे रूग्ण आढळून आले आहे.
आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही 7796 इतकी झाली आहे. यातील 4826 इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.







