अमळनेर(प्रतिनिधी) – येथील तहसीलदार यांनी पहाटे अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत वाळूमाफी यांच्या विरुद्धचा आपला हेतू कार्यवाहीतुन सिद्ध केला.
तहसीलदार मिलिंद वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार पहाटे आपल्या सहकार्यासह शहरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर सह चालकास पकडून कायदेशीर कारवाई करीत १ लाख २३ हजार ४७० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तालुक्यात सरास वाळू वाहतूक केली जात असल्याची ओरड होती पण महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सतत या वाळूमाफी यांच्या विरुद्ध वेळेस आपला जीव धोक्यात घालून रात्री बेरात्री कडक कार्यवाही करीत आहे. कधी कधीतर अपुरे कर्मचारी संख्या बळ असतांना व कोणतीच सुरक्षा नसतांना राष्ट्रीय संपत्तीचे जतन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रचिती अमळणेरकरणा पहायला मिळाली आहे.
तहसीलदार मिलिंद वाघ यांनी अमळनेर चा पदभार स्वीकारल्या पासून म्हणजेच सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यंत अवैधरीत्या वाळू चोरी करणाऱ्या वाळूमाफी यांच्या विरुद्ध कार्यवाही करून १६ ते १७ लाख रुपयाचा महसूल सरकारी खजिन्यात जमा केल्याचे विश्वसनीय माहिती मिळाली आहे. तसेच आता पर्यंत ९७ वाहनांवर कार्यवाही केली आहे त्यात डंपर, ट्रॅक्टर व प्याजोरिक्षा इत्यादीचा समावेश आहे.
एव्हढ्या मोठ्या प्रमाणात वाळूमाफी यांच्या विरुद्ध कार्यवाही व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल वसूल करणारे जिल्ह्यातील एकमेव तहसीलदार असावेत अशी चर्चा अमळनेरातील सुद्न्य नागरिक करतांना दिसत आहे.