पुणे (वृत्तसंथा) – यंदा देशभरातील साखर कारखान्यांमधून सुमारे 195 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्पादनात 22 टक्यांनी घट झाली आहे. देशात सर्वाधिक साखरेच्या उत्पादनात यंदा उत्तर प्रदेशाने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशातील 119 साखर कारखान्यांमधून 76.86 लाख टन, तर त्या खालोखाल महाराष्ट्रातून 50.7 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत महाराष्ट्रातून तब्बल 92.88 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्यावतीने देण्यात आली.