नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक शहरे लाॅकडाऊन देखील करण्यात आली आहेत. नागरिकांनी घरातच राहण्यांच सरकारकडून वांरवार आवाहन देखील करण्यात येत आहे.त्याचदरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली असून बंगालमध्ये पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.त्यामुळे भारतात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ९ वर पोहचली आहे.बंगाल मधील उत्तर कोलकाता येथील डम डम शहरातील हा रूग्ण (५५ वर्षीय) असून त्याच्यावर साल्ट येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याला हर्दयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. संबंधित रूग्ण हा व्हेंटिलेटरवर होता आणि शरीरातील अवयव एकामागून निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.