नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – समाज माध्यामातून अफवा पसरवल्याबद्दल आणि जमावबंदी तोडल्याबद्दल राजस्थानात किमान 29 जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांनी रविवारी आढावा बैठक घेतली. त्याचवेळी अफवा पसरवणाऱ्यांवर आणि जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. सर्व शक्यतांचा विचार करून उपाय योजना करण्याचे आदेश देण्यात आले. जीव वाचवण्यापेक्षा मोठे काहीही नाही, असे ते म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांनी गरज भासल्यास निमलष्करी दलांची मदत घेण्याचे आदेश दिले.