अमळनेर(प्रतिनिधी) – अमळनेरात सफाई कर्मचारी मुकादम व कर्मचारी यांना फोन द्वारे शिवराळ भाषा वापरून धमकी दिल्याच्या निषेधार्थ आज सफाई कामगार यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.
नपाचे मुकादम रामराजे यांना सफाई कामगार अजय जाधव याने खाडा लावतो म्हणून मनात राग धरून भ्रमणध्वनी द्वारे शिवराळ भाषा व धमकी दिल्याने न पा कर्मचाऱ्यां मध्ये संतापाची लाट उसळली होती.त्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनीं न पा प्रवेश द्वारा समोर सोशियल अंतर ठेवून धरणे धरून न पा मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांना माजी आमदार साहेबराव पाटील, कामगार नेते रामभाऊ संदांनशीव उपस्थितीत आपला निषेध नोंदवत सदर कामगारावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
याबाबत मुख्यधिकारी डॉ विद्या गायकवाड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सदर घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य व कडक कार्यवाही करू. कोरोना सारखे संकट शहरात असतांना सर्वांनी हातात हात घालून काम केले पाहिजे.
कामगार नेते रामभाऊ संदांनशीव यांनी यावेळी सांगितले की, कामगारांनी आपल्या मर्यादित राहून अधिकारी व कर्मचारी यांच्याशी बोलले पाहिजे. न पा प्रशासनाने वेळोवेळी कर्मचारी वर्गाचे हित जोपासली आहेत. कामावर हजर असेल त्यालाच कामावर ठेवण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्याधिकारी यांना असल्याने कामात कामचुकार पणा करू नये. लवकरच मुख्याधिकारी या घटनेची सखोल चौकशी करून न्याय देतील.
माजी आमदार तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे पती साहेबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित कामगारांची समजूत घातली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सफाई कामगार वर्गाने अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. शहरातील कोरोना आउट होण्यात सफाई कामगार यांची भूमिका खूप चांगली राहिली आहे. त्यामुळे कोणीही आपल्या सहकार्या सोबत अपशब्द वापरू नये. दोषींवर योग्य कार्यवाही नक्की करू.
सदर घटनेचा संताप कामगार वर्ग व्यक्त करीत होता. मुकादम वर्गाने जीविताच्या सुरक्षिततेची हमी न पा प्रधासनाने घ्यावी, अशी मागणी करत होते. सर्व कर्मचारी वर्गाने काळ्या फिती लावून आपला निषेध व्यक्त केला. लवकर न्याय नमिळाल्यास काम बंदचे आंदोलन करण्याचे सूतोवाच केले.