नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पाकिस्तानमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. लाहोरहून कराचीला जाणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) चे विमान कोसळले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात कराची विमानतळाजवळ झाला आहे. या दुर्घटेनेने किती जिवीत हानी झाली याची माहीत अद्याप समजू शकली नाही.
ANI
✔
@ANI
· 1h
Pakistan International Airlines (PIA) flight from Lahore to Karachi crashes near Karachi Airport: Pakistan media
View image on Twitter
ANI
✔
@ANI
Pakistani media report that the PIA aircraft which crashed was an A320 carrying close to 100 people. The aircraft crashed near a residential colony near Karachi airport; more details awaited.
515
3:46 PM – May 22, 2020
Twitter Ads info and privacy
158 people are talking about this
पीआयएचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी अपघाताची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, ए -320 हे विमानात 90 प्रवासी होते. सिंधचे आरोग्यमंत्री मिडिया कोऑर्डिनेटर मीनर युसूफ यांनी विमान अपघाताची माहिती मिळताच कराचीतील सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या आरोग्य व लोकसंख्या कल्याण मंत्र्यांनी ही रुग्णालयांना तयारीत राहण्यास सांगितले आहे.
दरम्यान, हा अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही. तसेच या अपघातात किती जीवीत हानी झाली हे देखील समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आल्या असून जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.