• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आता प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागत आहे – खा.वंदना चव्हाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – खासदार गिरीश बापट आणि भाजपा अध्यक्ष यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांच्या पक्षातील इतर वरिष्ठ पदाधिकारी देखील बेजबाबदार विधाने करत आहेत. त्यामुळे या आपत्तीतही भाजपाला नागरिकांच्या आरोग्यापेक्षा राजकारणात अधिक रस असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ हे स्वत:च महापालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत होते तर दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि महापालिकेतील गटनेते यांना न जुमानता श्रेय केवळ स्वत:ला लाटण्यासाठीच अधिक धडपड करत होते. मग अचानक असे नेमके काय झाले की, त्यांना आता प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागत आहे, असा प्रश्‍न चव्हाण यांनी विचारला आहे.
महापौर या नात्याने त्यांनी प्रशासन, महापालिकेतील सर्व पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, शहरातील आमदार आणि खासदार व तसेच या महामारीच्या वेळेस मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी समन्वय घडवून महापौर म्हणून आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित होते; परंतु तसे घडले नाही. नगरसेवक आपापल्यापरीने काम करत आहेत मात्र प्रशासनाचा समन्वय नसल्यामुळे आणि हे काम महापौरांचे असल्याने, जी दिशा मिळायला पाहिजे ते झाले नाही. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही भाजपच्या नगरसेवकांची खरडपट्टी केल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे.

आंदोलनाचा इशारा देणारे आणि पालकमंत्री अजित पवार यांना निशाणा करणारे शहरातील भाजपचे खासदार गिरीश बापट गेल्या 55 दिवसांपासून कोठे होते, असा प्रश्न अनेकजण विचारत आहे. सर्वाधिक बाधित रुग्ण कसबा, कॅंन्टोन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात आहेत. परंतु तेथील आमदार हे निष्क्रीय असल्याचे अनेक घटनांतून दिसून आले आहे, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.

शहरातील ही परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून पालकमंत्र्यांनी बैठका तर घेतल्याच परंतु ससून हॉस्पिटलला अतिरिक्त 55 कोटी रूपयांचा निधी देवून तिथे तातडीने कोव्हिड हॉस्पिटल उभे केले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गेल्या काही दिवसांत शहराचा तीन वेळा दौरा करून ससून हॉस्पिटल, नायडू हॉस्पिटलची पाहणी करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही शहराचा दौरा करून पोलीसांचे मनोबळ वाढवण्याची कामगिरी बजावली आहे.

करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण व्हावा, अशी भूमिका आघाडी सरकारने घेतली. तसेच त्यासाठी विविध सूचनाही वारंवार पक्षाने प्रशासनाला केल्या. विलगीकरण कक्षामध्ये असलेल्या त्रुटी, टेस्टिंगच्या प्रक्रियेत होणारा हलगर्जीपणा, तसेच सर्व सामान्य नागरिकांवर येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुढाकार घेत आहे. तसेच पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत आहेत. तर भाजप चे खासदार आणि अध्यक्ष निवेदने देऊन, आंदोलनाचा इशारा देऊन फक्त राजकीय स्टंटबाजी करत आहेत हे उघडपणे दिसत आहे. महापालिकेचा कारभार आपण चालवू शकत नाही म्हणून स्वत:च्या अपयशाचे खापर इतरांवर फोडून आपली असमर्थता झाकली जाईल असे वाटत असले तर जनता सूज्ञ आहे याची आठवण यांना असावी, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

करोनाचा फैलाव भारतात सुरू होत असताना काही तातडीचे निर्णय केंद्र सरकारने घेणे अपेक्षित होते; परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही जसे की, मार्च महिन्यात जेव्हा करोना बाधितांची संख्या भारतात वाढत होती तेव्हा दिल्लीत अधिवेशन सुरू होते वास्तविक अनेक खासदार अधिवेशन बरखास्त करण्याची वारंवार विनंती करत होते; परंतु काही राजकीय हेतूंसाठी या विनंतीकडे दुर्लक्ष केले गेले, तर काही सन्मानीय सदस्य सभागृहात मास्क परिधान करून आले असता त्यांना मास्क काढण्याचे आदेश दिले गेले, अशी टीका चव्हाण यांनी केंद्रसरकारवर केली आहे.

अचानकपणे पूर्वनियोजन न करता देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे अनेक स्थलांतरीत मजदूर, कामगार, विद्यार्थी यांना आपापल्या मूळगावी जाण्यासाठी अनेक कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागले त्यात काहींना जीव देखील गमवावे लागले तर दुसरीकडे या रोगाचा उद्रेक हा पर्यावरणातील अती मानवी हस्तक्षेपामुळे झाल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे, असे असताना देखील केंद्रीय पर्यावरण मंत्री अनेक पर्यावरणाला घातकच असणाऱ्या विकासकामांना या जीवघेण्या आपत्तीत देखील सहमती देत आहे.

एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता भाजपाचे नेते, पदाधिकारी किती निष्काकाळजीपणे आणि बेजबाबदारपणे वागत आहे हेच यावरून सिद्ध होते, परंतु मला असे प्रामाणिकपणे वाटते की ही वेळ राजकारण करण्याची नाही. आपण लोकप्रतिनाधी या नात्याने आपण ज्यांचे प्रतिनीधित्व करीत आहोत त्यांची रक्षा करणे महत्वाचे आहे यासाठी आपण सर्वांनीच एकत्रित येऊन सामुदायिक प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे, असेही चव्हाण यांचे म्हणणे आहे.


 

 

Previous Post

लॉकडाऊनमध्ये वरातीमध्ये विनापरवाना डीजे वाजवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

नागरिकांना गावाबाहेरील शाळा, समाज मंदिर आदी ठिकाणी क्वारंटाइन करणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नागरिकांना गावाबाहेरील शाळा, समाज मंदिर आदी ठिकाणी क्वारंटाइन करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
1xbet russia

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

यावल-किनगाव रस्त्यावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

April 20, 2026
जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon