• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

साताऱ्यात करोनाग्रस्तांची संख्या आता १६६

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2020
in महाराष्ट्र
0

सातारा (वृत्तसंस्था) – जिल्ह्यातील बनपुरी येथे क्वारंटाइनमधील म्रुत झालेल्या महिलेचा अहवाल करोना पाँझिटिव्ह आल्याने करोनामुळे आतापर्यंत म्रुत झालेल्या रुग्णांची संख्या तीन झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा २० जणांचे अहवाल पाँझिटिव्ह आल्याने एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता १६६ झाली आहे. तर १४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ६२ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

काल दि. 19 मे रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार सातारा जिल्ह्यात मुंबई, ठाणे व इतर भागातून प्रवास करुन आलेले सातारा तालुक्यातील वारणानगर येथील ३, वर्णे येथील १, रायगांव पोखरी येथील १, कोरेगाव तालुक्यातील न्हावी येथील १ व वेळू येथील १, खंडाळा तालुक्यातील अहिरे १ व अजनुज गावातील १, जावली तालुक्यातील वरोशी गावातील १, खटाव तालुक्यातील मायणी येथील १, आवळे पठार, डिस्क्ळ येथील १, पाटण तालुक्यातील बनपुरी येथील १, शिरळा येथील १, कराड तालुक्यातील म्हासोली येथील ४, खालकरवाडी चरेगाव येथील १ व शामगाव येथील १, अशा एकूण २० जणांचे अहवाल करोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये १९ ते ७० वर्षे वयोगटातील १५ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे.

उपरोक्त अहवालात वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या ४३ वर्षीय मृत महिलेचा अहवाल करोनाबाधित आला आहे. उर्वरित १९ पैकी ४ जणांना मध्यम स्वरुपाची तर १५ जणांना लक्षणे विरहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ३७, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ५५, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील ११, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील ११ व कोरेगाव येथील १५ अशा एकूण १२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कृष्णा मेडीकल कॉलेजमधीलल 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. असे एकूण १४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

दि.१९ मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात १०, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ५२ अशा एकूण ६२ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन.सी.सी.एस. यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १६६ झाली असून यापैकी ९० जण उपचार घेत अआहेत. ७३ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.


 

 

Previous Post

बालभारतीच्या वेबसाइटवरून 81 लाख पीडीएफ पुस्तके डाऊनलोड

Next Post

अपहरण झालेली १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी सापडली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अपहरण झालेली १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी सापडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
1xbet russia

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त
1xbet russia

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

महिलेच्या पोटातून दीड किलोची गाठ काढण्यात यश

April 23, 2026
जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा
1xbet russia

जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

April 23, 2026
चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात विनापरवाना अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon