औरंगाबाद (वृत्तसंस्था) – राज्यात मुंबई, पुणे या मोठ्या शहरानंतर आता औरंगाबादमध्येही करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. औरंगाबाद शहरात आज दिवसभरात तब्बल 41जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये करोनाबाधितांचा आकडा हा 1 हजार 117 वर पोहोचला आहे.

District Information office, Aurangabad
✔
@InfoAurangabad
#औरंगाबाद जिल्ह्यात आज 41 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1117 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
सविस्तर वृत्त: http://shorturl.at/ryBFP #Covid_19#coronavirus
View image on Twitter
60
8:01 AM – May 20, 2020
Twitter Ads info and privacy
24 people are talking about this
दरम्यान, करोनाचा वाढता आकडा नियंत्रणात ठेवण्यासाठी औरंगाबाद शहरात सध्या पॅरामिल्ट्री फोर्स तैनात करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनसह शहराच्या इतरही परिसरात हे जवान तैनात असणार आहेत. तर दुसरीकडे कंटेन्मेंट झोनमध्ये सुरू असलेली नागरिकांची वर्दळ कमी करण्यासाठी आता कंटेन्मेंट झोन परिसरात गस्ती पथक सुरू करण्यात आले आहेत. हे पथक दिवसातून दोन वेळा रेड झोन मध्ये गस्त घालणार आहे.
औरंगाबदमध्ये आज सकाळी करोना पॉझिटिव्ह आढळलेले रुग्णांमध्ये 16 महिला व 25 पुरुषांचा समावेश आहे. तर, गणेश नगर, सातारा गाव खंडोबा मंदिर, न्यायनगर, पुंडलिक नगर, पोलीस कॉलनी, लिमयेवाडी, मित्र नगर, शरीफ कॉलनी, मुकुंदवाडी, रोहीदास नगर, उस्मानपुरा, कैलासनगर, जुना मोंढा, भवानी नगर, शिवशंकर कॉलनी, बालाजी नगर, इंदिरानगर, खडकेश्वर, माणिक नगर, जयभीम नगर, संजय नगर, सिटी चौक, जिल्हा सामान्य रुग्णालय, आझम कॉलनी या शहरांमधील भागांसह फुलंब्री तालुक्यातील बाबारा भिवसने वस्ती व कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा या भागांमधील रुग्णांचा समावेश आहे.







