नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे सर्वसामान्य जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लॉकडाऊन दरम्यान एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. आज, म्हणजे 1 मेपासून अनुदानित एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
राजधानी दिल्लीत एलपीजी सिलिंडर 162.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून ते दिल्लीत 581.50 रुपयात उपलब्ध होईल. यापूर्वी यासाठी 744 रुपये द्यावे लागले. तथापि, हा दर वेगवेगळ्या राज्यात लागू असलेल्या करानुसार बदलू शकतो. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात.
मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत 579 रुपये असेल, तर आधी 714.50 रुपये द्यायची. कोलकाता येथे सिलिंडरच्या किंमतीत 190 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता ते 584.50 रुपयात उपलब्ध होतील. चेन्नई मधील सिलिंडर 761.00 च्या तुलनेत 569.50 रुपयात उपलब्ध असेल.
कच्च्या तेलाच्या किंमतीतील विक्रमी घट झाल्याने एलपीजीच्या किमतींमध्ये घसरण होत आहे. विना अनुदानित सिलिंडर सलग तिसऱ्यांदा स्वस्त झाले आहेत. या कपातीचा फायदा देशातील 15 कोटी ग्राहकांना होणार आहे.दुसरीकडे लॉकडाऊनच्या 38 व्या दिवशी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.