• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुण्यातील आयटी कंपन्यांनी नोकरीवरून काढल्याची शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांची तक्रार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 18, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – ‘करोना’मुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत एकाही कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढू नका, असे राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांनी देखील आवाहन केले आहे. परंतु पुणे अणि पिंपरी-चिंचवडमधील आयटी कंपन्यांमधील अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. फाईट (फोरम ऑफ आयटी एम्प्लॉइज)या आयटी कर्मचाऱ्यांची संघटनेने दिलेल्या माहितीनुसार शंभरहून अधिक आयटीयन्सला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. फाईटने या संदर्भात कामगार आयुक्‍त आणि राज्य सरकारकडे रीतसर तक्रार केली असून कर्मचाऱ्यांना कामावर काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. फाईट या संघटनेचे अध्यक्ष आणि राज्य सरकारने आयटी कर्मचाऱ्यांसाठी गठित केलेल्या समितीचे सदस्य पवनजीत माने यांनी दैनिक ‘प्रभात’शी बोलताना सांगितले की, आयटी कंपन्या पंतप्रधानांना आवाहनास देखील जुमानत नाहीत. आतापर्यंत नोकरीवरुन काढलेल्या शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात कामगार आयुक्‍त, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे तक्रार करण्यात आली आहे.आयटी क्षेत्रातील लहान-मोठ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या डोक्‍यावर ‘लॉकडाऊन’मुळे बेरोजगारीची तलवार लटकू लागली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका बड्या आयटी कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांकडून लॉकडाऊनच्या काळात रजेचे अर्ज लिहून घेतले आहेत. अर्थात लॉकडाऊनमुळे जे घरात बसले आहेत किंवा घरातून काम करत आहेत, त्यांच्या वर्षभराच्या रजा फुकट जाणार आहेत. जे आयटीयन्स सध्या कोणत्याही प्रोजेक्‍टमध्ये नाहीत किंवा ज्यांचे प्रोजेक्‍ट संपले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना ‘बेंच’वरील कर्मचारी म्हटले जाते. अशा कर्मचाऱ्यांना सर्वाधिक धास्ती आहे. ‘करोना’चे संकट संपूर्ण जगात पसरले असल्याने आऊटसोर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना सध्या तरी नवीन प्रोजेक्‍ट मिळणे अशक्‍य आहे. मग अशा कर्मचाऱ्यांना काय काम द्यायचे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. ‘फाईट’ या संघटनेने राज्यातील सर्व 288 आमदारांना सर्व एक खुले पत्र लिहिले आहे. तसेच आयटीयन्सला आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर हे पत्र आपल्या लोकप्रतिनिधींना ‘टॅग’ करावे. या पत्रात म्हटले आहे की एकीकडे कंपन्यांची संघटना सरकारकडून सवलती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे कंपन्या कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावून घेत आहेत. कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामे घेतले जात आहेत किेंवा त्यांना काढून टाकण्यात येत आहे. पत्रात म्हटले आहे की, गेल्या एक दशकामध्ये पहिल्यांदाच कंपन्या ‘स्लो डाऊन’ पाहत आहेत. तरीही या भीषण परिस्थितीत थोडा आर्थिक ताण सहन करुन कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्‍वती देण्यास तयार नाहीत. संघटनेकडे अशा शंभरहून अधिक आयटीयन्सची तक्रार आली आहे, ज्यांना नोकरीवरुन काढण्यात आले आहे. आमच्यापर्यंत न पोहचलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या यापेक्षा कित्येक अधिक असू शकते. याबाबत कामगार आयुक्‍त आणि कामगार मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. ज्या आयटीयन्सला टर्मिनेशन, सेलरी कट ऑफ, नॉन पेमेंट ऑफ सेलरीज अशा समस्या येत आहेत, त्यांनी तातडीने संपर्क साधावा. – पवनजीत माने, सदस्य, राज्यस्तरीय आयटी समिती


 

 

Previous Post

जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनला समर्थन

Next Post

लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या
1xbet russia

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण
1xbet russia

अंमली पदार्थविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण

June 12, 2026
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक
1xbet russia

पिंपरखेड मारुती मंदिर चोरीचा उलगडा; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

बालमजुरीचा पर्दाफाश; दोन गॅरेज चालकांवर गुन्हे

June 12, 2026
कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा; सर्व शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon