• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैध मद्यतस्करी रोखण्यासाठी सीमा नाकाबंदी करण्यात आली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 11, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात तसेच राज्यात पूर्ण लॉकडाऊन होऊन १६ दिवस पूर्ण झालेले आहे. संपूर्ण राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद आहेत. राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, प्रधान सचिव, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचारी अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध सातत्याने छापे टाकत आहेत.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत दि. २४ मार्च ते दि. ९ एप्रिल २०२० या एकूण १७ दिवसात २ हजार १३२ गुन्ह्यांची नोंद तर ५ कोटी किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच ९४ वाहने जप्त करण्यात आली असून ८२३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. ९ एप्रिल २०२० रोजी एका दिवसात १६७ गुन्हे नोंदविण्यात आले असून ६७ आरोपींना अटक करण्यात आली असून ३० लाख ९२ हजार किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.महाराष्ट्रात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्यतस्करी रोखण्यासाठी सीमा तपासणी नाके उभारून नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच राज्यात हातभट्टी/अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारा़विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ कलम ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे.आयुक्तांनी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे विभागातील सर्व विभागीय उपायुक्तांची बैठक घेतली असून ई-मेल व व्हॉट्सअपद्वारे दररोज आढावा घेण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात संबंधित अधिसूचनेचा भंग करून अवैध मद्यनिर्मिती व वाहतूक करणाऱ्या, त्यांना कच्चामाल व अन्य अनुषंगिक साहित्य पुरवठा करणाऱ्यांविरुद्ध साथीचे रोग कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये देखील गुन्हे दाखल करण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.अवैध मद्यनिर्मिती वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू आहे. नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००८३३३३३३, व्हॉट्सअँप क्रमांक ८४२२००११३३ व ई-मेल आयडी [email protected] आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. नमूद क्रमांकावर अवैध मद्याबाबतची तक्रार नोंदविण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.


 

 

Previous Post

पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलद गतीने करावे : आरोग्यमंत्री

Next Post

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश
1xbet russia

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार
1xbet russia

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जैन कंपनी

पाथरीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

April 29, 2026
शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक
1xbet russia

शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग; ३ बिघे मका जळून खाक

April 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

अटलांटा प्रकरण: मुख्यमंत्र्यांचे जळगाव मनपा आयुक्तांना आदेश

April 29, 2026
मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

मृत्यूच्या दारातून परतला जीव ; २१ वर्षीय तरुणावर यशस्वी उपचार

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon