• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाची तपासणी करण्यास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळा सज्ज

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 11, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नांदेड (वृत्तसंस्था) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्युबेशन केंद्रामध्ये ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ तयार झाली आहे. लवकरच प्रयोगशाळेला आवश्यक त्या मान्यता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) प्राप्त होणार आहेत. त्यानंतर कोरोना संसर्गजन्य द्रवाचे नमुने तपासणी सुरू करण्यात येणार आहे.या प्रयोगशाळेमध्ये एकाचवेळी दोन तासात 384 नमुने तपासण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची प्रयोगशाळा निर्मिती करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे पहिले ठरणार आहे. कोरोना संशयित रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी यापूर्वी औरंगाबाद येथे नवीन लॅब सुरू करण्यात आली असली तरी किटची उपलब्धता, संशयित रुग्णांची मराठवाड्यात वाढलेली संख्या तसेच आठ जिल्ह्यांचा भार यामुळे या ठिकाणी चाचणी होण्यासाठी विलंब लागत आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाडा, विदर्भ, व तेलंगणा येथील रुग्णांचे तपासणी अहवालासाठी या प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे. कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्याचे काम मध्यवर्ती ठिकाण म्हणून पूर्वीपासून पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन शाळेत सुरू आहे. यापुर्वी कोरोनाची तपासणी करण्यासाठी राज्यात केवळ चारच प्रयोगशाळा होत्या, कोरोना तपासणीसाठी लागणारी यंत्रणा मुबलक प्रमाणावर उपलब्ध करण्यासाठी शासनाने काही नवीन प्रयोगशाळांना मंजूरी देऊन ती संख्या 16 पर्यंत वाढवली त्यात औरंगाबादच्याही प्रयोगशाळेचाही समावेश आहे.
मात्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या पुढाकारातून ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’निर्माण होत आहे. नांदेड मधील विद्यापीठाच्या इंक्युबेशन केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे असलेली सुसज्य प्रयोगशाळा असल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्याशी चर्चा करून ‘कोरोना संसर्ग तपासणी प्रयोगशाळा’ सुरु करण्याकरिता केंद्र सरकारच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) सादर केला होता. लवकरच या बाबतची मान्यता मिळणार आहे.
विद्यापीठाच्या इंक्युबेशन केंद्रासाठी यापूर्वीच ‘रुसा’ कडून ५ कोटी एवढा निधी मिळाला होता. त्यामुळे अत्याधुनिक अशा उपकरणाची उपलब्धता आहे.याशिवाय प्रयोगशाळेसाठी अजून आवश्यक असलेले उपकरणे व सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५२ लाख रुपये मंजूर केले आहेत. प्रयोगशाळेसाठी लागणारे अत्याधुनिक उपकरण रियल टाईम पीसीआर उपलब्ध आहे. त्याद्वारे एकाचवेळी दोन तासात ३८४ कोरोना संसर्गाचे स्वॅबचे नमुने तपासता येणार आहेत. प्रयोगशाळेतील नमुने परीक्षणाचे काम इंक्युबेशन केंद्राचे समन्वयक डॉ.जी.बी.झोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. इतरही लागणारे उपकरणे विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील वापरण्यात येणार आहेत. यासाठी लागणारे कुशल व अनुभवी मनुष्यबळ इंक्युबेशन केंद्रामध्ये काम करीत असलेल्या ‘स्टार्ट अप’मधील व्यक्तींची निवड केल्या जाणार आहे. शिवाय बाहेरील प्रशिक्षित मनुष्यबळाची नेमणूक करण्यात येणार आहे. कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून या प्रयोगशाळेचा १०० मी अंतरापर्यंत कुणीही येणार नाही यासाठीची पूर्ण उपाययोजना करण्यात येणार आहे. इथे फक्त पूर्ण सुरक्षित कपड्यामध्ये प्रशिक्षित कर्मचार्यांनाच प्रवेश दिल्या जाणार आहे. या प्रयोगशाळेमुळे मराठवाडयातील आणि आजूबाजूच्या राज्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. कोरोना संशयितांच्या घशातील द्रवाची (स्वॅब) तपासणी लवकरात लवकर होईल. आणि कोरोणाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर तात्काळ औषोधोपचार करता येणार आहे.


 

 

Previous Post

लॉकडाउनमध्ये महाराष्ट्र सायबरची उत्तम कामगिरी

Next Post

आमदार फंडाचा वापर कोरोना प्रतिबंधात्मक वैद्यकीय सामग्री विकत घेण्यासाठी :शिवराजसिंह चौहान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आमदार फंडाचा वापर कोरोना प्रतिबंधात्मक वैद्यकीय सामग्री विकत घेण्यासाठी :शिवराजसिंह चौहान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon