मुंबई (वृत्तसंस्था) – नागपूरात कोरोनाच्या सहा नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 5 एप्रिलला एक 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर करण्यात आलेल्या चाचणीत हा रुग्ण कोरोना पोजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सहाही जणांचे कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. या नव्या सहा रुग्णांमुळे नागपुरातील कोरोना बधितांची संख्या आता 25 झाली आहे. यापैकी 4 रुग्ण बरे झाले आहेत. 68 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पोजिटिव्ह आल्यावर तो राहत असलेला सतरंजीपुरा परिसर पोलिसांनी सील करून कुटुंबियांचे विलगीकरण केले होते. आता या सहाही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नागपूर :- एकूण पॉझिटिव्ह नमुने – 25, मृत्यू – 1, रुग्णालयातून बरे होऊन सुट्टी – 4,रुग्णालयात उपचार सुरू – 20.