मुंबई (वृत्तसंस्था) – आरोग्य विभागाने राज्यात वेगवेगळ्या 1674 ठिकाणी छापेमारी केली असून बनावट सॅनेटायझर आणि मास्कचा अनधिकृत स्टॉक जप्त करण्यात आला आहे. बनावट सॅनेटायझरच्या कारखान्यावर आरोग्य विभागाने ही कारवाई केल्याची माहिती वैदकीय शिक्षण मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. दरम्यान राज्यात पाच ठिकाणी ही कारवाई केली असून कारवाईत 1 कोटी 14 लाख, 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जे लोक बेकायदेशीरपणे सॅनेटायझर आणि मास्कचा साठा करतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हंटल आहे.