जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील नेव्हरे शिवारात शेतात कपाशीवर फवारणी करीत असताना सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तरुण शेतकरी अशोक उर्फ बुधा एकनाथ पाटील यांना विषबाधा झाली. त्याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे आज मंगळवारी 22 रोजी सकाळी 7.30 वाजता उपचार दरम्यान मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती असी अशोक उर्फ बुधा एकनाथ पाटील (वय36) काल सोमवारी शिरसोली शिवारातील नेव्हरे शिवारातील शेतात कपाशीवर फवारणी करीत होते. दुपारी 2 वाजेच्या सुमारास विषारी औषधांची बाधा झाल्यामुळे प्रकृती गंभीर झाली यावेळी नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचारांती आज मंगळवारी 22 रोजी सकाळी 7: 30वाजता त्यांचा मृत्यू झाला. अशोक पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुपारी 12 वाजता आणण्यात आला होता. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.