जळगाव न्यायालयाच्या सूचना ; तिन्ही विधिज्ञांचा यशस्वी पाठपुरावा
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- नेपाळ देशात बस दुर्घटनेत भुसावळ व मुक्ताईनगर तालुक्यातील एकूण २५ भाविकांचा मृत्यू झाला होता. तर एक तरुणी बेपत्ता झाली होती. या अपघातप्रकरणी मोटार अपघात प्राधिकरणअंतर्गत दावे दाखल करण्यास अडचणी येत होत्या. मात्र विविध दाखले दिल्यानंतर व कायद्याच्या आधारे न्यायालयाला सांगितल्यावर दावे दाखल करून घेण्याच्या सूचना जळगाव जिल्हा सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांनी दिल्या आहेत.
भुसावळ तालुक्यातील वरणगांव, फुलगाव, आचेगाव, भुसावळ तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील काही भाविक हे तिर्थयात्रेसाठी नेपाळ येथे ऑगस्ट महिन्यात देवदर्शनासाठी गेले होते. राजधानी काठमांडू यथे जात असतांना तनहुँ राज्यात त्यांच्या बसचा अपघात झाला व सदर अपघातात ही बस १५० मीटर खोल सरसयांडी नदीच्या दरीत कोसळली होती.(केएसएन) या अपघातात २५ भाविकांसह चालक व क्लिनर मिळून २७ जणांचा मृत्यू झाला होता. तर गोकर्णी संदीप सरोदे अद्यापही बेपत्ता होती. यात १६ प्रवासी गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शी जखमी प्रवासी साक्षीदारांनी सदर अपघात हा बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर अपघात घडल्यानंतर नेपाळ देशाच्या तनहुँ राज्यातील आँबुखैरनी पोलिस स्टेशन यांनी सदर अपघाताबाबत फिर्याद नोंदविली. फिर्यादीच्या आधारे घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट इत्यादी दस्तवेज “Motor Vehicle and Traffic Management Act of Nepal” या कायद्याखाली अपघाताची चौकशी करण्यात आली. परंतु सदर अपघातात बसचा चालक व क्लीनर देखिल मयत झाल्याने गुन्हा “Abate” करण्यात आला.(केएसएन) या सर्व तपास कामादरम्यान तपासाअंती अंतीम अहवाल काठमांडू येथिल भारतीय दुतवासाला पाठविण्यात आले. या प्रकरणातील नेपाळ सरकारने बनविलेले सर्व दस्तवेजांवर नेपाळी भाषेत मयत व जखमींचे नावे लिहले होते. तसेच भारतीय उच्चार व नेपाळमध्ये करण्यात येणारे उच्चार यामध्ये भलीमोठी विविधता असल्याने मयत व जखमींच्या नमुद केलेल्या नावांच्या शब्द लेखनामध्ये फरक होता. भारतातील कोणतेही शासकीय काम करण्याकरीता आधारकार्ड हे सर्वात प्रमुख दस्तावेज गृहीत धरण्यात येते.
ही बाब लक्षात येताच संपुर्ण दस्तावेज पुनश्चः केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताईंनी दुरूस्त करण्याचे निर्देश देत सर्व दस्तावेजांवरती भविष्यात अडचण यायला नको या करीता वकिल अॅड. महेंद्र सोमा चौधरी व अॅड. श्रेयस महेंद्र चौधरी यांच्या सल्ल्याने सर्व दस्तवेजांवर भारतीय आधारकार्ड प्रमाणे नाव दुरूस्त करण्यात आले. त्यानुसार सर्वाचे मृत्यु दाखले देखिल भारतीय राजदुतावास काठमांडू यांच्या कडुन देण्यात आले. (केएसएन)मुळ मुद्दा मोटार अपघात नुकसान भरपाईचा होता. ज्यामध्ये अपघात हा भारतीय स्थळ सिमे बाहेर झाला असल्याने भारतीय न्यायालयात सदर दावा चालु शकतो का? हा प्रमुख प्रश्न उद्भवला होता. सदर अपघातामध्ये मयताच्या वारसांना व जखमींना नुकसान भरपाई मिळणेकामी सर्वानुमते एकुण ४६ नुकसान भरपाई दाव्यांकरीता अॅड. महेंद्र सोमा चौधरी, अॅड. श्रेयस महेंद्र चौधरी व अॅड. संजय राणे. यांची नियुक्ती निश्चीत केली.
सदर वकिलांनी पूर्ण अभ्यास करून मोटार वाहन प्राधिकरणाला पटवुन दिले की, सदर दावे चालविण्याचा व सदर दाव्यात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई देण्याचा अधिकार हा संपुर्णपणे भारतीय न्यायव्यवस्थेला आहे. ज्यात प्रमुख मुद्दा होता की, अपघाती बसमधील सर्व प्रवासी हे प्रयागराज, उत्तर प्रदेश, भारत या ठिकाणाहुन बसमध्ये बसले होते, व त्यांचा परतीचा प्रवास देखिल भारतातच संपणार होता.(केएसएन) अपघातग्रस्त बस ही भारतीय देशाची नोंदणीकृत बस होती. त्याचा चालक, मालक हे देखिल भारतीय होते. अशा परीस्थितीत जरी सदर नागरीक हे देशाबाहेर असले तरी त्यांना भारतीय कायदा हा लागू होतो. कायदा हा केवळ स्थळसिमेसाठी नाही, तर नागरीकत्वासाठी देखिल लागु आहे. असा युक्तीवाद माननीय उच्च न्यायालयाच्या एका न्यायनिवाड्याला अनुसरून प्राधिकरणासमोर करण्यात आले.
सदर अपघातग्रस्त प्रवासी बस यांनी विमा कंपनीला विमा काढतांना भारतात व भारतातील जवळपासचे देश जसे नेपाळ, भुतान, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान या देशात जाण्याकरीता अधिकृत विमा संरक्षण कवच विमा कंपनीकडून घेतले होते. म्हणजेच कोणतीही जबाबदारी भारताव्यतिरीक्त इतर कोणत्याही देशात घडली असती तरी देखिल विमा कंपनीला भरपाई देण्यास भाग पडले.(केएसएन)अशा विविध युक्तीवादाव्यतीरिक्त सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाकडे अगोदरच्या दुर्मिळ अपघातात जे काही न्यायनिवाडे दिले आहेत, सदर न्यायनिवाड्याच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमान. बी. एस. वावरे व सदस्य, मोटार अपघात प्रधिकरण, जळगांव यांनी सदर दावे दाखल करून घेण्याच्या सूचना दि. १ जानेवारी रोजी दिल्यात. या व्यतिरीक्त भारतीय वेळ नेपाळचे हिंदु कॅलेंडर व तारखा तसेच बस मधील तीर्थयात्री हे थर्डपार्टी विम्याच्या व्याख्येत येतात का? नेपाळचे फौजदारी कायदे तसेच मोटार वाहन कायदे यांची भारतातील कायदयांशी सांगता घालून कोर्टाला पटवून दिले. अर्जदारांतर्फे युक्तीवादादरम्यान अँड. संजय राणे, अँड. महेंद्र सोमा चौधरी, अँड. श्रेयस महेंद्र चौधरी यांनी बाजू मांडली.