जळगाव ( प्रतिनिधी) – येथील अग्रवाल चौकात राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर एका चहाच्या दुकानजवळ गावठी कट्ट्याद्वारे दहशत माजवणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीनुसार, संजय हिवरकर, राजेश मेढे, रवी नरवाडे, अविनाश देवरे, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, दत्तात्रय बडगुजर, महेश महाजन यांनी जाऊन खातरजमा केली. बुधवारी दुपारी नितेश मिलिंद जाधव (वय 21) रा.पिंप्राळा स्मशानभूमी हा महामार्ग क्र. 6 वर अग्रवाल चौकात, ब्रेन हॉस्पिटलजवळ एका चहा टपरीजवळ लोखंडी पिस्टल बेकायदेशीर बाळगून, मी जळगावचा दादा आहे, पोलीस देखील मला घाबरतात असे म्हणून दहशत माजवीत होता. त्याच्याकडून पिस्टल जप्त करण्यात आले आहे.