विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक
जळगाव प्रतिनिधी) :- स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक २०२६ चे महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी आज मतदानाच्या दिवशी सकाळीच आपले गाव तांदळवाडी येथे ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. त्यांनी गावातील सर्व देवादिकांचे आशीर्वाद घेऊन विजयासाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. दरम्यान, या निवडणुकीत महायुतीचे पारडे अत्यंत जड मानले जात आहे.


महायुतीकडे स्वतःचे हक्काचे ४७३ नगरसेवक असून, इतर अपक्ष लोकप्रतिनिधी आणि छोट्या पक्षांनीही नंदकिशोर महाजन यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. संख्याबळाचे हे गणित पाहता महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय निश्चित मानला जात असून, आता केवळ विजयाची अधिकृत औपचारिकता शिल्लक राहिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.









