नागपाडा (वृत्तसंस्था) – शनिवारी सकाळी नागपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोरलॅण्ड रोड येथे एनआरसी, सीएए, एनपीआर या केंद्र सरकारच्या कायद्याविरुद्ध आंदोलन सुरू होते. यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी हिरव्या पडद्याचे छत लावण्यात आले होते. हे पडते काढत असताना पोलिसांनी आवश्यकतेपेक्षा जास्त बळाचा वापर केला. यावेळी पोलिसांनी महिलांच्या बाबतीत असंवेदनशीलता दाखवली असल्याचा आरोप आंदोलनांकडून करण्यात येत आहे. आंदोलकांनी ही तक्रार केल्यानंतर वरिष्ठ पातळीवर गंभीरतेने दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर चौकशीनंतर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जोपर्यंत चौकशी चालू आहे तोपर्यंत वरिष्ठ पोलीस निरिक्षक शालिनी शर्मा यांना मुंबई बाग, मोरलॅण्ड रोड, नागपाडा येथून दूर ठेवण्यात येणार आहे.