पारोळा (प्रतिनिधी) – कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गामुळे देशात युध्दजन्य परिस्थिती निर्माण होवुन सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शहरातील साईबाबा मराठी हिंदी व उर्दु सार्वजनिक वाचनालय, पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघ व देवा गृप फाऊंडेशन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबीरात एकुण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दरवर्षी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असते.
कोरोना च्या पाश्वभुमीवर सोशल डिस्टन्स पाळुन शिबीर घेण्यात आले.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष गुणवंत पाटील,पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीष वाणी,प्रा.शि.प्रविण कोळी,जिल्हा शिक्षा समिती जिल्हाध्यक्ष यशवंत पाटील,गृपचे खान्देश प्रमुख अमोल भदाणे,सुजित ढोले,पत्रकार अभय पाटील,रमेशकुमार जैन,योगेश पाटील,संजय पाटील
यांनी शिबीर स्थळी भेट देवुन शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केल.
शिबीरास मिळाले अनेकांचे सहकार्य
सोनार समाज मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबीरात धुळे येथील नवजीवन ब्लँड बँकचे डाँ सुनिल चौधरी,दिलीप जाधव,चंद्रकांत धनगव्हाळ,गजानन चौधरी पांडुरंग गवळी हे रक्तसंकलनासाठी आले होते.
या शिबीरास देवा गृप फाऊंडेशनचे तानाजी मोरे,अविनाश खोडसे यांनी सहकार्य केले.
शिबीर यशस्वीतेसाठी पारोळा तालुका दर्पण पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यांचेसह संस्थेचे अध्यक्ष चारुदत्त मोरे,देवा गृपचे फाऊंडेशनचे पदाधिकारी अजय राजपुत,मनिष मराठे,सुरज पाटील,ज्ञानेश्वर पाटील,भुषण पाटील,सागर पाटील,अजय पाटील,गोविंदा महाजन,मुकेश पाटील,मनोज निकम यांनी सहकार्य केले.








