!
सहा वर्षांच्या प्रेमाचा अवघ्या ३० सेकंदात अंत ; वसईतील दुर्दैवी घटनेने समाजमन सुन्न !
वसई: ;-सहा वर्ष एकमेकांवर प्रेम करणाऱ्या प्रेयसीच्यासोबत झालेल्याला महिन्याभरापूर्वीच्या ब्रेकपनंतर अवघ्या ३० सेकंदात संशयाच्या भुताने घेरलेल्या प्रियकराने पान्ह्याच्या साहायाने डोक्यात वार करून तिला भर रस्त्यात ठार केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी वसईच्या चिंचपाड्यात घडली असून याप्रकणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान घटना भररस्त्यात घडली असतांना नागरिक बघ्याची भूमिका घेत असल्याने माणुसकी ओशाळली असेच चित्र दिसून आले.
22 वर्षीय आरती यादव रा. नालासोपारा (पूर्व) असे मयत तरुणीचे नाव ती मूळची राहणार उत्तर प्रदेशमधील. रोहित यादव वय ३२ असे आरोपीचे नाव असून तो नालासोपारा पूर्व येथील राहणार आहे. तो मूळचा हरियाणाचा. आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरातील कंपनीत कामाला होती. रोहित यादव आणि आरती यादवचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी रोहित यादव हा बेरोजगार होता. महिनाभरापूर्वीच दोघांचंही ब्रेकअप झालं होतं. आरतीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रोहितला होता. याच संशयातून रोहितने आरतीची हत्या केल्याचं म्हटलं जातंय.
वसई पूर्वच्या चिंचपाडा परिसरातली साडेआठ वाजता रोहितने अचानक डाव साधत आरतीवर हल्ला केला. आरती कामाला निघाली होती. पाठलाग करणाऱ्या रोहितनं आधी एक वार करत आरतीला जमिनीवर पाडलं.. मग तिच्यावर लोखंडी पान्याने एकामागे एक 15 वेळा वार केले. हे सगळं घडत असताना बरीच गर्दी जमा झाली. एक जण रोहितला रोखण्यासाठी पुढे आला. पण रोहितने त्याच्यावर देखील पाना उगारल्याने तो मागे झाला. तिनं जीव सोडला पण रोहितमधला हैवान शांत झाला नाही. क्यूं किया.. क्यूं किया.., असं तो बोलत राहिला, आरतीच्या मृतदेहाला जाब विचारत राहिला. शेवटी पाना तिथंच फेकला. या सर्व घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी रोहित यादवला अटक केली आहे.