सावदा गावात शोककळा
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गारबर्डी धरणात बुडाल्याने सावदा शहरातील १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन रमजान ईद सणाच्या दिवशी मुलाच्या घरी शोककळा पसरली आहे.
शे.ताबिश शे.रमजान मोमीन (वय १५, ख्वाजानगर, सावदा ता. रावेर) असे मयत मुलाचे नाव आहे. ऐन रमजान ईदच्या दिवशी गुरुवारी दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत गुरुवारी ईदगाहवरील सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर गारबर्डी धरणावर फिरायला गेला. तेथे पाय घसरून पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकीकडे रमजान ईदचा उत्साह असताना शेख ताबिश यांच्या मृत्यूच्या बातमीने ख्वॉजानगरात धक्का बसला. तो दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.