पारोळा पोलीस स्टेशनची कारवाई
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वंजारी शिवारातील एका शेतकऱ्याच्या विहिरीतील इलेक्ट्रिक जलपरी मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी पारोळा पोलिसांनी दोन आरोपींना मुद्देमालसह अटक केली आहे.

समाधान गुलाब पाटील (वय ३४) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दि. २४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास वंजारी खु।। ता. पारोळा येथील शिवारातील शेतात असलेली विहीरीत सोडलेली ५५०० रुपये किमतीची टेक्समो कंपनीची ईलक्ट्रीक मोटर जलपरी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. म्हणून दि. ११ ऑक्टोंबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्र फिरवली.
पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल पाटील, प्रवीण पाटील, आशिष गायकवाड, अभिजीत पाटील, संदीप सातपुते या पथकांनी मोटर चोरी करणारे गोरख प्रकाश मोरे (वय ३३, रा वंजारी ता. पारोळा), लखन रमेश गायकवाड (वय २९,रा. राजीव गांधी नगर, पारोळा) यांना त्यांच्या घरून मुद्देमालासह अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एम एम काझी यांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.









