अमळनेर येथे घेण्यात आली बैठक
अमळनेर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, अमळनेर संघटनेची नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात दि. २८ रोजी मुंबई विधान भवनावर निघणाऱ्या मोर्चा संदर्भात चर्चा करण्यात आली.
तसेच कर्मचाऱ्यांचे विविध समस्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिष पाटील, तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील,जिल्हा सचिव प्रदीप महाजन, जिल्हा संघटक विश्वास कोळी, तालुका सचिव सुभाष पाटील, तालुका कार्यकारणी सदस्य व तालुक्यातील ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.