जळगाव ( प्रतिनिधी ) – मोबाईलवर गेम खेळतांना हँडसेटच्या बॅटरीचा अचानक स्फोट होऊन शेलवड (ता. बोदवड) येथे दहा वर्षीय बालक जखमी झाला आहे. चेतन प्रफुल्ल पाटील असे बालकाचे नाव आहे.
भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील चेतन प्रफुल्ल पाटील (वय १०) हा बालक दिवाळीच्या सुटीनिमित्त शेलवड येथे मामाच्या घरी गेला होता. मंगळवारी मोबाईलवर गेम खेळत असतांना हँडसेटमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला. यामुळे चेतनच्या हाताला इजा झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले
कोरोना काळात सुट्टीमुळे आणि ऑनलाईन शिक्षणाच्या नादात विद्यार्थ्यांना मोबाईलचे व्यसन अधिक जडले. दिवसभर मोबाईल गेमिंगचे प्रमाण देखील वाढले आहे. या दुर्घटनेमुळे मोबाईलच्या वापरातील धोका पुन्हा अधोरेखीत झाला आहे. लहान मुलांच्या हातात मोबाइल देणे टाळा. चार्जिंगला लावलेला असतांना शक्यतो मुलांच्या हातात मोबाईल द्यायला नको , असे डॉक्टरांनी सांगितले.