जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील जिल्हा परिषदजवळ नवजीवन कलेक्शनसमोरील मोकळ्या जागेतून तरुणाचे 15 हजार रुपये किमतीचे 2 मोबाईल एकाने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राधेश्याम कैलास पांडे (वय-22 रा. शनिपेठ) काल सायंकाळी जिल्हा परिषद रोडवरील नवजीवन कलेक्शनसमोरील मोकळ्या जागेवर उभे असताना त्यांचा 5 हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि सोबत असलेल्या चंद्रकांत भीमराव पाटील यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल संशयित आरोपी विजय गुलाबराव पवार याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विजय पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो ना किशोर निकम करीत आहे.