पहूर (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील लोढरी तांडा येथील युवा शेतकरी राजमल सोना चव्हाण वय 30 या युवा शेतकऱ्याने दि.4 सप्टेंबर पासून रात्री नऊ वाजल्यापासून घरातून गबेपत्ता होता. आज दि. 6 सप्टेंबर रोजी गावालगत असलेल्या एका विहिरी मध्ये त्याचे प्रेत आढळले असून त्याच्यावर दोन लाख रुपये कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे कर्ज फेडू न शकल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या पश्चात पत्नी आई आजी 3 मुली असा परिवार असून त्याच्या या दुःखद निधनामुळे लोढरी तांडा गावात हळहळ व्यक्त होत आहे