जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) : जागतीक महिला दिनानिमित्त शुक्रवारी दि. ८ मार्च रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचा कारभार हा महिला अंमलदारांनी पाहीला. पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणुन पोलीस हेड कॉन्स्टेबल निलोफर सैय्यद यांनी कामकाज पाहीले.
तसेच मपोहेका अफसाना तडवी यांनी दुय्यम अधिकारीचे कामकाज पाहीले. मपोहेका सुनंदा तेली यांनी ठाणे अंमलदार म्हणुन काम केले व मपोका. सपना येरगुंटला यांनी सीसीटीएनएसचे कामकाज पाहीले. मपोका हसीना तडवी यांनी ऑफिस हजरचे कामकाज केले. तसेच पोलीस स्टेशनला सफाई कर्मचारी म्हणुन काम करणारे महीला लिलाबाई म्हस्के, निर्मलाबाई तायडे, बनाबाई जाधव व महीला अंमलदार यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सत्कार केला.