जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील मयूर हायटेक इंडस्ट्रीज कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवार २६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरात एन-सेक्टरमध्ये मयूर हायटेक इंडस्ट्रीज नावाची रबर मोल्डिंग कंपनी आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिक वायर तयार केले जाते. पाच ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे शटरचे लॉक तोडून दुकानातून कंपनीतून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक वायर इलेक्ट्रिक ग्राइंडर, लोखंडी मोल्ड व साचे असा मुद्देमाल चोरून नेला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनी मालक जितेंद्र शांताराम बडगुजर (वय-३९,रा. भूषण कॉलनी, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुरुवार २६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन मुंडे करीत आहे.