• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईत गावठी कट्टा आणि धारदार कोयता जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईत गावठी कट्टा आणि धारदार कोयता जप्त

सराईत तिघांना न्यायालयीन कोठडी

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला त्याच्या दोन साथीदारांसह एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे बाळगून फिरत असलेल्या या त्रिकुटाकडून पोलिसांनी गावठी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतूस आणि धारदार कोयता जप्त केला आहे.

जळगाव शहर कांचन नगर परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार तेजस दिलीप सोनवणे (वय २५) याला उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीचा आदेश धुडकावून तेजस सोनवणे त्याच्या साथीदारांसह घातक हत्यारे घेऊन नेहरू नगर परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती २५ ऑक्टोबर २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली.

माहितीची खात्री होताच, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. या पथकात सफौ विजयसिंग पाटील, पोहेकाँ गणेश शिरसाळे, पोहेकाँ प्रमोद लाडवंजारी, पोहेकाँ किरण चौधरी, पोकॉ गणेश ठाकरे, पोकॉ किरण पाटील, पोकॉ नितीन ठाकुर, पोकॉ राहुल घेटे आणि पोकॉ योगेश घुगे यांचा समावेश होता.

या पथकाने तात्काळ शिरसोली रोडवरील नेहरू नगर भागातील संदीपनी बॉईज हॉस्टेल परिसरात सापळा रचला. संशयास्पद हालचाल करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांनी त्यांची नावे तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव), खुशाल पितांबर सोनार (वय २१, रा. पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर, जळगाव) आणि चेतन पितांबर सोनार (वय २३, रा. पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर, जळगाव) अशी सांगितली.

झडतीदरम्यान, हद्दपार असलेला आरोपी तेजस सोनवणे हा आदेशाचे उल्लंघन करताना आढळला. तसेच, त्याचा साथीदार खुशाल सोनार याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. तिसरा आरोपी चेतन सोनार याच्याकडे धारदार पाते असलेला लोखंडी कोयता आढळून आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन ही घातक शस्त्रे जप्त केली.

तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना  न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि पोकॉ चेतन पाटील हे करीत आहेत. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली.


 

 

Tags: #crime #jalgaon #midcpolice
Previous Post

संगीत रिसर्च अकादमीच्या महोत्सवाचे जळगावी आयोजन

Next Post

कारचे टायर फुटून अपघात; कुटुंबातील चौघांसह ५ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक

कारचे टायर फुटून अपघात; कुटुंबातील चौघांसह ५ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे भू-संपादन प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

May 14, 2026
धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
1xbet russia

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026
उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

उमाळा घाटात दुचाकी दरीत कोसळली; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon