जळगावातील एमआयडीसीमधील घटना
जळगाव ;-एमआयडीसी परिसरात समृद्धी केमिकल कंपनी असून गेल्या तीन दिवसांपासून कंपनी बंद असल्याने कंपनी आवारातील एका कुंडामध्ये साचलेल्या पाणी आणि गाळ काढण्यासाठी एका कामगाराला सांगितले होते. मात्र हा कामगार गाळात रुतु लागल्याने त्याने बचावासाठी आरडाओरड केल्याने त्याच्या मदतीसाठी धावून आलेल्या ठेकेदारही कुंडात जाऊन पडल्याने दोघांनी बचावासाठी आवाज दिल्याने तिसरा त्यांना वाचविण्यास गेला मात्र तोदेखील इतरांसोबत अडकल्याने तिघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , अयोध्यानगर रस्त्यावरील जुन्या एमआयडीसीतील ए सेक्टरमध्ये प्लाॅट क्र. ८४,८५ मध्ये सुबोध सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी यांच्या मालकीची समृद्धी केमिकल्स नावाची रासायनिक खत निर्मिती करण्याची कंपनी आहे. अपर्णा सुयोग चौधरी यांच्या नावावर ही कंपनी आहे.
समृध्दी केमिकल या कंपनीत दिलीप अर्जुन सोनार (वय ५४ मूळ खिरोदा ह.मु. कांचन नगर) हे कामाला असून जमिनीला लागून असलेलले कुंडात गाळ साचल्याने तो काढण्यासाठी ते उतरले असता या गाळामध्ये अडकल्याने त्यांनी बचावासाठी आरडाओरड केल्याने मजूर ठेकेदार रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी ३० चिंचोली यावल यांनी त्यांना हात देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ते देखील कुंडामध्ये जाऊन पडले . मात्र दोघांचा आवाज एकून मयूर विजय सोनार (वय ३०, रा. कांचननगर, जळगाव) हा देखील मदतीसाठी धावून आला मात्र तो देखील जाऊन पडला .
तिघांना कंपनी मल्कासहित कामगारांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी मृत घोषीत केले.सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांच्या श्वासनलिकेत केमिकलयुक्त घाण, सांडपाणी व गाळ अडकला व त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला . याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते . तिघांचे शविच्छेदन करण्यात येऊन नातेवाईकांना मृतदेह देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसीचे निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळावरील टाकी तसेच संपूर्ण कंपनीची पोलिसांनी पाहणी केली. कामगारांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. संभाव्य वाद लक्षात घेता कंपनी मालक दोघा भावांना तातडीने ताब्यात घेण्यात आले.