जळगाव (प्रतिनिधी)- एमआयडीसी परिसरातील कुसूंबा शिवारातील मकरा यांच्या वॉलकंपाडऊच्या बाजुला असलेल्या एका पत्र्याच्या शेठमध्ये गुरांची कत्तल करून उर्वरित मास,शिंग, कातडी पडून असल्याचे आढळून आल्याने अज्ञात व्यक्तीविरूध्द एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, कुसूंबा शिवारात असलेल्या मकरा यांच्या वॉलकंपाऊंड लगत असलेल्या पत्र्या शेडमध्ये आज दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास गुराची कत्तल करून त्याचे हाड,मास,शिंग, कातडी असे सांगाडे आत आढळून आले. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सफौ.आनंदसिंग पाटील, पोहेकॉ. नरसिंग राजपुत, अजय नेरकर, विश्वास बोरसे आदींनी पोलिस निरीक्षक विनायकराव लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पंचासह भेट दिली. यावेळी पालिकेचे आरोग्य कर्मचारी संजय पवार, विशाल वानखेडे, सिध्दार्थ घेंगट या पंचाव्दारे पंचनामा करून या सांगाड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.