जळगाव ( प्रतिनिधी ) ;- हिवताप प्रतिरोध मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसावद अंतर्गत.१४ रोजी वावडदा, म्हसावद , बोरनार जळके ,वसंतवाडी , रामदेववाडी , व आदी गावांमध्ये राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम , हिवताप (मलेरिया),डेंग्यू, चिकूनगुनीया ,इ आजारापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून जनजागृती निर्माण केली जात आहे जलद ताप सर्वेक्षण , साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडणे, औबेटिंग , डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे , वाहती करणे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, लावणे , गटारी वाहत्या करणे , याबद्दल नागरिकांना आवाहन केले जात आहे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत म्हसावद येथील वैद्य.अधिकारी डॉ निलेश अग्रवाल व तालुका हिवताप पर्यवेक्षक नंदू सपकाळे,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा आ केंद्र म्हसावदचे कर्मचारी एस. आर . पिंजारी , पी एन गढरी , श्री.रंगरे ,श्रीमती तायडे,श्रीमती लढे ,आशा वर्कर इ. ही मोहीम राबवित आहे