कार्यालयाची तोडफोड करून ५० ते ६० हजारांचे नुकसान ; ७ अज्ञातांविरुद्ध गुन्हा
भडगाव (प्रतिनिधी ) भडगावच्या महावितरणच्या उपकेंद्रावर आज ७ रोजी शिवसेनेतर्फे वीजबिलाविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तात ११ ते साडे अकरा वाजेच्या सुमारास टाळा ठोको आंदोलन करण्यात आले होते . मात्र दुपारी १२ : ४५ वाजेच्या सुमारास ७ अज्ञात व्यक्तींनी येऊन उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे हे भांडण सोडवीत असताना त्यांनाही धक्काबुक्की झाल्याने ते खाली पडून मयत झाले. ७ जण राणे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्यावरून फिर्यादी अजय अशोक धामोरे वय 43 धंदा नोकरी उपकार्यकारी अभियंता भडगाव कक्ष राहणार वृंदावन पार्क पाचोरा यांनी भडगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुरन 133/2019 भादवि कलम 307,304, 353,332,143,147,148,149,294,223,504,506,427 सह सार्वजनिक मालमत्तेची हानी प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. अशोक रावजी उतेकर हे करीत आहे.