जाफराबाद (प्रतिनिधी) – मराठा समाजाचा शिपाई,सेवक म्हणून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी समाजाला एकत्र करण्यासाठी मराठा समाजाची गरिबी दूर करण्यासाठी मी हा मराठा संवाद दौरा करीत आहे असे प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी जाफराबाद येथे दिनांक ४ रविवारी बोलतांनी केले..
जाफराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकल मराठा समाज बांधवांशी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी संवाद साधला यावेळी ते म्हणाले कि मराठा आरक्षणनाचा लढा फार औघड़ परिस्थितितुन चालला आहे, समाजाच्या ज्या मागण्या आहे ते अत्ताचा सरकार सुद्धा सोडू शकतो हे मी सरकार ला सांगितले आहे, तरी आपण सुद्धा कायदेशीर कामाला लागले पाहिजे, कोरोना च्या परिस्थिति विषयी भोसले म्हणाले कि
माझी समाज बांधवांना विनंती आहे की कोरोना कोविड अजून गेलेला नाही कृपया सर्वांनी मास घालून आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असे त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधताना सांगितले….
यावेळी जाफराबाद तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते….
अचानक ठरलेला दौरा असुनही तालुक्यातील समाज बांधवांची उपस्थिती ही लक्षणीय होती,