जळगाव ( प्रतिनिधी ) – मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांचे हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा सचिव अँड.जमिल देशपांडे यांची उपस्थिती होती. नविन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आली. हे कार्यालय दुकान नं.७४ , शामाप्रसाद उद्यान मार्केट, सुरेश कलेक्शन मागे, मुक-बधिर शाळेजवळ सुरू करण्यात आले आहे या उद्घाटन सोहळ्याचे निमित्ताने शहरात व जिल्ह्यामध्ये ई – श्रम कार्ड नोंदणी शिबीरांचे आयोजन १४ ते २४ नोव्हेंबर पर्यंत होत आहे नोंदणी केंद्र सरकारच्या वतीने असंघटीत कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देतांना अडचणी दुर करण्यासाठी करण्यात येणार आहे नोंदणी झाल्यावर पात्र नोंदणीधारकाला २ लाखाचा अपघात विमा लागु होणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा संघटक राजेंद्र निकम, जिल्हाध्यक्ष विरेश पाटील, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, चित्रपट सेना जिल्हाध्यक्ष अक्षय राजपुत, तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, शहर संघटक निलेश अजमेरा, शहर उपसंघटक गोविंद जाधव, विशाल कुमावत, चाळीसगांव तालुका संघटक भाईदास बोरसे, भुसावळ तालुका संघटक दिनेश चव्हाण, भुसावळ शहर संघटक मंगेश भावे, यावल तालुका उपसंघटक निलेश खैरनार, चोपडा तालुका संघटक अजय परदेशी, धरणगांव तालुका संघटक राजु बाविस्कर, जळ्गाव तालुका संघटक गणेश नेरकर, उपसंघटक महेश माळी, विलास बडगुजर, गोरख गायकवाड, सिध्देश कवठाळकर, सागर पाटील, अविनाश जोशी, मनोज खुळे, रमेश भोई, संतोष सुरवाडे, सतिष सैंदाणे, संदिप पाटील, गणेश कोळी, संदिप महाले, पंकज चौधरी, संदिप मांडोळे, अविनाश पाटील, संदिप पाटील, इम्रान पिंजारी, रज्जाक सैय्यद, मतिन पटेल, भुषण रांजन, कुणाल पाटील, कुणार पवार, योगेश पाटील.उपस्थित होते.