जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील मनपाच्या वैद्यकीय विभाग व आयएमए जळगाव शाखेतर्फे मंगळवार दि.१३ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे सर्व शाळांमध्ये वितरण करण्यात येणार आहे.
१ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणारी तसेच शाळाबाह्य मुले – मुली यांचे आरोग्य चांगले राहावे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे या उद्देशाने २०१५ पासून हा दिवस सुरू करण्यात आला आहे.
१ ते १९ वर्ष वयोगटातील बालकांनी व विद्यार्थ्यांनी गोळ्या घेऊन मोहिमेचा फायदा घ्यावा असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिका व इंडियन मेडिकल असोसिएशन ( आयएमए )जळगाव शाखेतर्फे करण्यात आले आहे.